संजय राऊत वैफल्यग्रस्त झालेत. त्यांना वाटले होते केंद्रात सरकार येईल. सत्तेत आल्यावर आम्ही हे करू, ते करू अशा प्रकारच्या राणाभीमदेवी थाटात त्यांची वक्तव्य आणि घोषणा होत्या. आता सगळा त्यांचा भ्रमनिरास झाला आहे, असा सणसणीत टोला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच पुन्हा मोदी सरकार आले, पुन्हा राज्यातले वातावरण चांगले होऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे भविष्यात आपल्या पुढे काय वाढलेय या चिंतेत राऊत आहेत. त्या चिंतेतून संजय राऊत अशाप्रकारची वक्तव्य करत असल्याचेही दरेकर म्हणाले. (Pravin Darekar)
दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, देशात असलेल्या प्राप्त परिस्थितीनुसार निकाल आलेत. महाराष्ट्रातील राजकारण एकतर्फी, जातीय व्यवस्थेमध्ये विभागले गेले त्यामुळे असा निकाल लागला आहे. तसे पाहीले तर उद्धव ठाकरे यांनी काय मिळवले? एवढ्या जागा लढवूनही त्यांना केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १५ जागा लढवून त्यांना ७ जागा मिळाल्यात. कोकण हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जायचा तिथे भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने घवघवीत यश मिळवले आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असेल परंतु त्याचे मतात परिवर्तन झालेले नाही त्याचा फायदा काँग्रेसला झाला. परंतु भाजपा आणि शिवसेना यावर उद्धव ठाकरेंचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. (Pravin Darekar)
दरेकर पुढे म्हणाले की, भाजपा सगळ्या आव्हानांना सामोरे जात आज इथपर्यंत पोचली आहे. दोन खासदारांपासूनचा प्रवास देशाने पाहिलेला आहे. महायुतीत असणारे पक्षही संघर्ष करणाऱ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आहेत. महायुती म्हणून एकत्रितपणे या सगळ्या आव्हानांचा नीट विचार करून सामोरे जाऊ आणि विधानसभेला निर्विवाद अशा प्रकारचे बहुमत मिळवू, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूका लढविण्याचा अधिकार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आहे. याबाबत सरकार योग्य ती दखल घेऊन हस्तक्षेप करेल आणि यातून सुवर्णमध्य साधण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. (Pravin Darekar)
(हेही वाचा – Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सल्ला दिला अन् स्वतःच झाले ट्रोल)
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राजकारणात उद्धव ठाकरे हे ज्या क्षणी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले त्या दिवशी राजकारणात कुणीही कुठेही जाऊ शकतो अशा प्रकारचे वातावरण आहे. रोहित पवार भाजपात येऊ शकतात या त्यांच्या बोलण्याला काही अर्थ असेल. (Pravin Darekar)
संजय राऊत यांच्यावर टीका करताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी मोदी सरकार येणार नाही अशा प्रकारे भविष्य सांगितले होते. परंतु सरकार आलेही आणि उद्या ते देशाचे पंतप्रधान होताहेत. सकाळी उठून केवळ डरकळ्या फोडायच्या या पलीकडे संजय राऊत यांना काम नाही. बिनबुडाचे, निराधार बोलून चर्चेत राहायचे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनी ५ वर्ष आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी एकत्र असू हे ठणकावून सांगितले आहे हे संजय राऊत यांना ऐकायला आले नाही का? असा सवालही दरेकरांनी केला. (Pravin Darekar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community