Pravin Darekar : संजय राऊत आणि नाना पटोले वैफल्यग्रस्त?; प्रविण दरेकरांची टीका

संजय राऊत मुद्दामहुन आदित्य ठाकरे यांना डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य, ट्विट करतात का? असा सवालही दरेकर यांनी यावेळी विचारला.

149
Pravin Darekar यांनी सांगितला राजकारणातील 'हा' महत्त्वाचा पाया

संजय राऊत, नाना पटोले हे वैफल्यग्रस्त झाले असून सकाळी उठल्यावर काहीतरी निराधार शोधायचे आणि पब्लिसिटीत राहायचे अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊला सहकुटुंब होते त्याच हॉटेलमध्ये खाली रेस्टॉरंट आहे. ते कुटुंबासोबत असताना राजकारण करत ट्विट करणे हे अशोभनीय आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपलीही बोटं बर्बटलेली आहेत, अशी घणाघाती टीका भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोमवारी (२० नोव्हेंबर) एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. त्याचवेळी संजय राऊत मुद्दामहुन आदित्य ठाकरे यांना डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य, ट्विट करतात का? असा सवालही दरेकर यांनी यावेळी विचारला. (Pravin Darekar)

मराठा आरक्षणावर बोलताना दरेकर म्हणाले की, हे विषय आपापल्या सोयीने एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी रीतसर मार्गाने दिले होते. त्यात ज्या त्रुटी दाखवल्या आहेत. ज्या अडचणी आहेत त्यावर मार्ग काढून मराठा आरक्षण द्यायला हवे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचे हातपाय बांधले होते का? असा सवालही दरेकर यांनी केला. तसेच महाराष्ट्र सरकारची स्पष्ट भुमिका असून मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच आहे. पहिल्या दिवसापासून सांगितले आहे की, कायद्याच्या चौकाटीत टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे तकलादू आरक्षण द्यायचे नाही. मात्र ज्या प्रक्रिया आहेत त्यासाठी वेळ लागतोय. जरांगे पाटील यांनी परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचेही दरेकर यांनी यावेळी नमूद केले. (Pravin Darekar)

जालन्यातील लाठीचार्जवर बोलताना दरेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करत असताना आपली प्रतिमा आणि प्रतिभा जपलेली आहे. त्याही वेळी सांगितले जात होते याचा देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशी काहीही संबंध नाही. प्रशासकीय पातळीवर गृहविभाग निर्णय घेत असतो आणि अधिकाऱ्यांना ते अधिकार असतात, याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले. वडेट्टीवर यांनी केलेल्या विधानाचाही दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वडेट्टीवार हे जबाबदार विरोधी पक्षनेते आहेत. तेच बोलतात मी नीट बोलले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाविषयी बोलताना जबाबदारीने बोलले पाहिजे. (Pravin Darekar)

(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Accident : बोगद्यात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न, पंतप्रधानांनी घेतला आढावा)

उबाठा पक्षाच्या नेत्यांनी टीका करताना, भुमिका मांडताना एकवाक्यता ठेवली पाहिजे. अंधारे यांची भुमिका वेगळी आणि भास्कर जाधवांची भुमिका वेगळी. त्यामुळे त्यांनी भुमिका ठरवावी. कुणाला चालवण्याची भाजपाला अजिबात आवश्यकता नाही. भाजपा स्पष्ट भुमिका घेऊन राजकारण करते. आमच्या सरकारची भुमिका देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केलीय. उबाठा पक्षाला भुमिका नाही. त्यामुळे असेच काहीतरी शोधून आपले राजकारण करीता त्यांचे हे असले फालतू प्रयत्न सुरू असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. (Pravin Darekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.