मविआचे मराठा प्रेम पुतना मावशीप्रमाणे; Pravin Darekar यांचे टिकास्त्र

128
Pravin Darekar यांनी संजय राऊतांना दिला 'हा' इशारा; म्हणाले...

मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी विरोधकांवर टिकास्त्र डागले आहे. मराठा आरक्षणाबाबतचे महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले, असे दरेकर म्हणाले. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. चर्चेपासून पळ काढू नये, असा टोलाही दरेकरांनी लगावला. (Pravin Darekar)

पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाविषयी मार्ग काढावा आणि जातीय तेढ निर्माण झालेय ते संपवावे असा ज्येष्ठत्वाचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण आणि ओबीसी विषय सोडवावा अशा प्रकारची भूमिका मांडताहेत. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाची मागणी, महाराष्ट्रातील वातावरण सलोख्याचे व्हावे याबाबत पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. परंतु विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरद पवार, उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक बैठकीला उपस्थित नव्हते. हा प्रश्न असाच भिजत राहावा आणि त्या आधारे महाराष्ट्रात जातीय संघर्ष राहावा, महाराष्ट्र पेटत राहावा, त्या पेटलेल्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजावी, अशा प्रकारचा नीच विचार मविआच्या नेत्यांच्या मनात असल्याचे कालच्या अनुपस्थितीवरुन दिसून आल्याचेही दरेकर म्हणाले. (Pravin Darekar)

(हेही वाचा – दूधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; DCM Ajit Pawar यांची विधानसभेत ग्वाही)

दरेकर पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षांची नेमकी काय भूमिका आहे ती लेखी स्वरूपात मागवा. ह्यांचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ दे असे बैठकीत सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्व पक्षांकडून लेखी भूमिका मागण्याचे ठरवले. त्यामुळे आज आम्ही विधानपरिषदेत हा विषय मांडला. काल शरद पवार, उद्धव ठाकरे नेमके का अनुपस्थित होते? काँग्रेसचे नेते का येऊ शकले नाहीत? याचा अर्थ त्यांना हे वातावरण असेच धगधगते राहावे, आपला काही स्वार्थ साधता येतोय का ? एवढे नीच राजकारण करताना विरोधक दिसताहेत. काल आणि आज महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांचे खरे रूप समोर आलेय. शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काय भूमिका आहे. यातून काय मार्ग काढायला हवा? हे सांगावे. चर्चेपासून पळ काढू नका. जितके पळाल तितका तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल, असा घणाघातही दरेकरांनी केला. (Pravin Darekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.