Pravin Darekar यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…

188
Pravin Darekar यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीसाठी आव्हानाची भाषा केली असली तरी कोण राहणार आणि कोण जाणार हे महाराष्ट्रातील जनताच ठरवणार असून निवडणुकीपर्यंत वाट बघूया. निकालानंतर कोण राहिले आणि कोण गेले हे स्पष्ट होईल. कारण जसे मोदींना घालवण्यासाठी देश एकवटला होता, सारे पक्ष एकवटले होते, सगळ्या प्रवृत्ती एकवटल्या होत्या, परंतु मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांना घालवणारेच गेले, असा सणसणीत टोला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना लगावला.

(हेही वाचा – Mumbai Water Problem : जलवाहिन्यांवरील गळती शोधून काढण्‍यासाठी आयुक्तांचे निर्देश! म्हणाले…)

दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, उद्धव ठाकरेंना आता माहित आहे त्यांच्यात एकमताने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देऊ शकत नाही. कारण एकट्या काँग्रेसमध्येच ४-४ उमेदवार आहेत. त्यात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार इच्छुक आहेत. शिवाय तरुण नेतृत्व बंटी पाटील, विश्वजीत कदम आहेत. त्यामुळे ६-७ नावांपैकी एकाचे नाव कोण आणि कसे जाहीर करणार. शिवाय राष्ट्रवादीतही सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे एक नाव येणार नाही याची उद्धव ठाकरेंना कल्पना असल्यानेच त्यांनी असे वक्तव्य केलेले असावे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे एक नाव देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Maharashtra Rain Update: राज्यात पाऊस ‘नाराज’; काय सांगतो हवामान खात्याचा ताजा अंदाज? वाचा सविस्तर)

सरकार योजनेवर खर्च करते…

दरेकर म्हणाले की, कुठल्याही सरकारची योजना असेल त्या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी खर्च करत असते. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत हा खर्च होत असतो. आणि ते नेमके कशासाठी खर्च केले याचाही हिशोब दिला जात असतो. असे असताना काहींना त्यात काही गैरव्यवहार वाटला तर बोलू शकतात. मात्र एखादी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक योजनेवर सरकार खर्च करत असते त्याच पद्धतीचा खर्च असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे ठाम समर्थनही केले. (Pravin Darekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.