उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वाविषयी बेगडी प्रेम; Pravin Darekar यांचे खडेबोल

122
उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वाविषयी बेगडी प्रेम; Pravin Darekar यांचे खडेबोल
  • प्रतिनिधी

शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे हिंदूंच्या, हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी असून ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काय भूमिका निभावली ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेय, अशा परखड शब्दांत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले.

शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दादर पूर्वेतील रेल्वे प्लॅफॉर्मला लागून असलेल्या पुरातन हनुमान मंदिराला रेल्वेने तोडण्यासाठी दिलेल्या नोटिसिवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या अन्य मोठ्या नेत्यांवर टीकास्त्र करत भाजपाच्या हिंदुत्वाला बेगडी संबोधत तुफान टीका केली त्यालाही दरेकर यांनी चोख प्रत्युत्तरही दिले. ते म्हणाले की, बांगलादेशात असणाऱ्या हिंदूंच्या मागे भाजपा पूर्णपणे ताकदीनीशी उभा असून त्यांच्यासोबत आमच्या संवेदनाच आहेत. केंद्र सरकारही त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे. मात्र ज्यावेळी केंद्र सरकारने याबाबत नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आणला त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे हिंदूंविषयी किंवा हिंदुत्वाविषयी बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असेही दरेकर (Pravin Darekar) यांनी सुनावले.

(हेही वाचा – मुख्यमंत्री कार्यालयात Ashwini Bhide यांची प्रधान सचिव पदी वर्णी)

ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार सोडला आणि सत्तेच्या लाचारीसाठी ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वावर टीका केली, वीर सावरकर यांच्याविषयी गरळ ओकली त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच उरत नाही. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी सातत्याने सावरकरांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. सावरकरांची प्रतिमाच काढा असे जेव्हा काँग्रेसने सांगितले तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तोंडाला कुलूप लावले गेले होते का? असा रोखठोक सवालही दरेकरांनी (Pravin Darekar) उपस्थित केला.

दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे पराभवाने खचले आहेत. कारण बेटंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्यांनी तमाम हिंदू प्रेमी मतदारांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि उद्धव ठाकरे यांच्यासकट महाविकास आघाडीची जी धुळधाण उडालीय त्यातून ते हतबल झालेत. त्यातूनच मग अशा प्रकारच्या नवीन क्लुप्त्या काढून वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न उद्धव ठाकरेंचा सुरू आहे. हनुमान मंदिराच्या बाबतीत आता जागे झालेत. रेल्वे प्रशासनाने जी काही नोटीस पाठवली आहे ती आम्ही बघून घेऊ. परंतु राम मंदिराच्या निर्माणावेळी कुत्सितपणाने टोमणे मारणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांची आठवण आली. नक्कीच आमच्या देवदैवतांनी आणि हिंदुत्वाने त्यांना जमिनीवर आणलेय. त्यामुळेच त्यांना आता नाईलाजाने का होईना आपली भूमिका बदलावी लागतेय, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, पाच वेळा मंदिराला नोटीस पाठवली त्यावेळी आमचे सरकार नव्हते. आता नोटीस गेलीय म्हणजे लगेचच मंदिर तोडले असे होत नाही. केंद्र आणि राज्य सरकार लक्ष घालेल आणि निश्चितच मंदिराचे रक्षण करणे किंवा त्यांची पुनःस्थापना योग्य पद्धतीने करणे ही आमची जबाबदारी असून त्यापासून कसुभरही मागे हटणार नसल्याचे दरेकरांनी यांनी ठाकरे यांना ठासून सांगितले.

(हेही वाचा – CC Road : प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची देखरेख, तरीही सिमेंट काँक्रिटची कामे निकृष्ट दर्जाची)

राज्याला स्थिर सरकारच मिळेल

दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराची आपल्याला कल्पना नसली तरी याबाबत अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. दोन उपमुख्यमंत्री आणि त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून फडणवीसांनी सुतोवाच केले होते की, नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. १६ तारखेला अधिवेशन आहे. त्याआधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. मात्र विरोधकांनी चिंता करायचे कारण नाही. महाराष्ट्रात तीन पक्षाचे, महायुतीचे सरकार आहे. आणि ज्यावेळी अशा प्रकारचे सरकार असते त्यावेळी एकमेकांच्या जागा, खातेवाटप निश्चित करणे हे नीट व्हावे लागते. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात ते होईल आणि महाराष्ट्राला स्थिर, भक्कम सरकार मिळेल,असाही दावा त्यांनी यावेळी केला.

(हेही वाचा – रस्‍ते कॉंक्रिटीकरणाच्‍या कामाचा दर्जा तपासा; Ashish Shelar यांची मागणी)

नानांच्या वक्तव्याचा, कृतीचा आम्हाला फायदा

पटोलेंच्या पदमुक्त करण्याच्या मागणीवर आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. नाना पटोले यांना पदमुक्त करायचे की काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करायचा की काँग्रेसला आणखी अधोगतीला जाऊ द्यायचे, हा त्यांच्या पक्षातील विषय आहे. मात्र पटोले यांनाच परत प्रदेशाध्यक्ष ठेवा, म्हणजे आमचे काम आणखी सोपं जाईल. कारण पटोलेंच्या वायफळ बोलण्यातून, वागण्यातून आणि त्यांच्या कृतीतून आम्हालाच मदत होत असते, असा खोचक टोलाही दरेकरांनी लगावला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.