‘दाऊद नाव केवळ मुस्लिमांचच का?’ दरेकरांचा मलिकांना सवाल

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. यावेळी नवाब मालिकांनी समीर वानखेडे यांना शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा गंभीर आरोप मलिकांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिकांवर हल्लाबोल केलाय. यावेळी प्रविण दरेकर असे म्हणाले, ‘नवाब मलिकांनी जातीवाचक आणि व्यक्तीगत राजकारण करू नये. तर दाऊद नाव केवळ मुस्लिमांचेच आहे का?’ मराठ्यांमध्येही आहेत , असा सवाल ही त्यांनी उपस्थितीत केला आहे.

मलिक हवेत गोळीबार करतात

“नवाब मलिक यांनी जातीवाचक किंवा व्यक्तीगत राजकारण करू नये. दाऊद हे नाव केवळ मुस्लिमांचेच आहे का? मराठ्यांमध्येही आहेत. तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेकडून कारवाई करण्यात येईल. नवाब मलिक हवेत गोळीबार करतात,” असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित)

भाजप आणि परमबीर सिंह यांचा संबंध नाही

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना बुधवारी फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर प्रविण दरेकरांनी प्रतिक्रिया देतांना असेही सांगितले की, “डाव काही नाही, अनिल देशमुख किंवा परमबीर यांना कायदा समान आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. परमबीर सिंह आमचे काही लागतात का?” यासह भाजप आणि परमबीर सिंह यांचा संबंध नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here