मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा पूर्वनियोजित कट होता?; Pravin Darekar यांचा कीर्तिकरांवर गंभीर आरोप

244
Pravin Darekar यांनी संजय राऊतांना दिला 'हा' इशारा; म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून उमेदवारी मिळवायची, अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार म्हणून आणि दुसरा कुणी उमेदवार नसेल तर अर्ज मागे घेण्याच्यावेळी आपला उमेदवारी मागे घ्यायचा व आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला आणि त्या दृष्टीने वागणूक दिली. परंतु कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता ते आता स्पष्टपणे बाहेर येत असल्याचेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (Pravin Darekar)

पुण्यातील कार अपघातावर बोलताना दरेकर म्हणाले की, अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नाही. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. गृहमंत्री असूनही जनतेच्या हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी केली. ज्या ३०४ अ कलमासंदर्भात विरोधक टीका करताहेत ते ३०४ कलम असल्याचा दावाही गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. कारण फडणवीस हे अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याचा दावाही दरेकर यांनी केला. फडणवीस स्वतः वकील असल्याने पोलिसांइतकेच त्यांनाही कायद्याचे ज्ञान आहे. राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत. ते नवखे नाहीत. पोलीस त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाहीत. त्यांना कलमं माहित आहेत. ज्या पबमध्ये आरोपी गेला होता त्या पबवरही कारवाई झालेली आहे. मात्र विरोधक या प्रसंगाचे फक्त राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. (Pravin Darekar)

(हेही वाचा – Milind Narvekar : गेले नार्वेकर कुणीकडे?)

दरेकरांनी ‘हा’ ठाम विश्वास केला व्यक्त

रविंद्र धंगेकर आणि निलेश लंके यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, रविंद्र धंगेकर एकदा आमदारकीला विजय मिळाल्यामुळे समजात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करून आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही. कारण सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या विषयात गंभीर आहेत. कारवाई करताहेत. धंगेकरांना केवळ या विषयाचे राजकारण करायचे आहे. धंगेकर पराभूत होणार असल्याचे माहित असल्याने त्यांची नौटंकी सुरू आहे. निलेश लंकेही त्याच धाटणीतील आहेत. त्यांचाही पराभव होणार आहे. बाळूमामा म्हात्रेही भिवंडीतून हरणार आहेत. तसेच अनिल देशमुख यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचाही दरेकरांनी (Pravin Darekar) चांगलाच समाचार घेतला. जे गृहमंत्री म्हणून तुरुंगात जाऊन आले, ज्यांनी शंभर कोटीचे वाझेला टार्गेट दिले होते, ज्यांनी बदल्यांमध्ये हैदोस घातला होता त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का? असा प्रश्न विचारत देशमुख यांनी नाकाने कांदे सोलू नये, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. दरेकर पुढे म्हणाले की, मुंबईत सहाच्या सहा जागा भाजपा आणि शिवसेना जिंकेल. त्यामुळे राज्यात ४५ पार करण्याच्या जवळपास आम्ही पोहोचू. परंतु ४० च्या वर भाजपा व महायुती शंभर टक्के जागा जिंकू ४० च्या खाली एकही जागा नसेल असा ठाम विश्वासही यावेळी दरेकर यांनी व्यक्त केला. (Pravin Darekar)

दरेकर म्हणाले की, निवडणुका, मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानत असू तर त्या उत्सवाकरिता आवश्यक अशी यंत्रणा सुसज्ज करणे हे निवडणूक यंत्रणेचे कामच आहे. मात्र त्यात पूर्णपणे निवडणूक विभाग अपयशी ठरलेला असून या दुरावस्थेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मी सत्ताधारी पक्षाचा म्हणून भूमिका घेतलेली.मी स्वतः प्रत्येक मतदान केंद्रावर फिरलो. कोंबड्याचा खुराडा असतो तशा प्रकारची व्यवस्था होती. घुसमटून लोकं मेली नाहीत हे आपले नशीब आहे. मतदान केंद्रे वातानुकुलीत असावी, वेटिंगच्या जागाही वातानुकुलीत असाव्यात, एका मतदान केंद्रावर कमीत कमी ५०० मतदार घ्यावेत जेणेकरून गर्दी होणार नाही, अशा प्रकारच्या नियोजनाची भविष्यात गरज असून येणाऱ्या अधिवेशनात या सर्व अव्यवस्थेचा पर्दाफाश मी करणार असा इशाराही दरेकर यांनी दिला. (Pravin Darekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.