- प्रतिनिधी
सहकार हा वाढला पाहिजे. मी राजकारणात इथपर्यंत झेप घेतली त्यात सर्वात महत्त्वाचा पाया कुठला असेल तर तो सहकार चळवळीचा आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना ताकद आणि दिशा देण्याचे काम तुमच्या सहकार्याने भविष्यात करायचे आहे, असे प्रतिपादन भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) मजूर सहकारी संस्थांच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दादर येथे मुंबई शहर जिल्हा मजूर सहकारी संस्थांची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण शंकर, सचिव दादासाहेब इंगळे, खजिनदार प्रिया मर्गज, मुंबई बँकेचे संचालक प्रकाश दरेकर, आनंदराव गोळे, सुनील बांबूळकर, सुनील येवले, राजू देसाई यांसह संस्थेचे संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(हेही वाचा – बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध; Akshay Shinde चा मृतदेह घरी आणणार का? वाचा सविस्तर…)
यावेळी बोलताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, गेली २५-३० वर्ष आपण सारेजण एकत्रितपणे मजूर चळवळीचा गाडा हाकतोय. अनेक संकटांना, अडचणींना अंगावर घेतले. बदनामी होऊनही मजूर चळवळीतून मागे हटलो नाही. कारण मी जो काही इथपर्यंत आलोय त्यात तुम्हा सर्वांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव मला सातत्याने असते. सर्व संकटांवर मात करून आपण आपली चळवळ अबाधित ठेवण्याचे काम केले. शासनाकडून आपण ३ कोटी पर्यंतची कामे मंजूर करून घेतली आहेत. १५ सदस्य केले, क्लासिफिकेशनच्या अडचणी दूर केल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आपल्यामागे ठामपणे उभे राहिले आणि आपल्याला १० लाखांपर्यंत विनानिविदा ३ कोटीपर्यंतच्या कामाची मर्यादा घालून पुरेसे काम मिळतेय. आता दिवस बदलले आहेत. पूर्वीच्या काळी आपण ज्या पद्धतीने काम करायचो तसे पुढील काळात चालणार नाही. दप्तरं, रेकॉर्ड, संस्था नीट ठेवावी लागणार आहेत.
(हेही वाचा – Digital Arrest Scam ला ८५ वर्षीय महिला पडली बळी)
दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, मजूर संस्थांची खाती उघडून घ्या. मुंबई बँकेत झीरो बॅलन्स खाते संस्थेच्या सभासदांचे उघडून घेऊ. रायगड बँकेत खाती उघडा. जेणेकरून व्यवहार करणे सुलभ आणि सोपे जाईल. गेली २०-२५ वर्ष आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकलात. अडचणीच्या काळात न बिथरता ठामपणे मागे उभे राहिलात. त्याबाबत तुम्हा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. मजूर संस्थांएवढे चांगले आणि निश्चित काम कुठलाच कंत्राटदार देऊ शकत नाही. कामाचा चांगला दर्जाही आपण देतो. आपण उत्तम आहोत, आपण गुणवत्ता देतोय हे दाखवावे लागते. मुंबईत २०-२५ हजार सहकारी संस्था आहेत. त्यापैकी ७० टक्के संस्था कार्यरत नाहीत. त्या संस्थांना कसे कार्यरत केले पाहिजे. सामान्यांना कशा प्रकारे सेवा देता येईल याची साखळी येणाऱ्या काळात निर्माण करण्याचा मानस असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community