राज्य सरकारला मराठा समाजाचा आवाज दाबता येणार नाही! दरेकरांची प्रतिक्रिया

कोरोनाचं भांडवल करत मराठा आरक्षणाला मूठमाती देऊ नका, अशी विनंती दरेकर यांनी केली.

भाजप मराठा समाजासोबत आहे. मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करत तज्ज्ञ लोकांच्या सहाय्याने लवकरच मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील श्रीकांत भारतीय आणि स्वतः दरेकर यांचा समावेश असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

काय म्हणाले दरेकर?

राज्य सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला दुर्लक्ष करत आपल्या अपयशाचं खापर केंद्राच्या माथी फोडण्याचे काम मविआ मधील नेते करत आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, त्याचा कायदा उच्च न्यायालयात टिकवला आणि फडणवीस सरकार सत्तेवर असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही या कायद्याला स्थगिती आली नव्हती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला असल्याची टीका दरेकर यांनी केली.

(हेही वाचाः मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा सरकारवर घणाघात!)

मराठा आरक्षणाला मूठमाती देऊ नका

कोरोना संकटाच्या नावाखाली मराठा समाजातील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करू नये. कोरोना निश्चित आहे काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. परंतु त्याचबरोबर मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यांच्या भावना ते व्यक्त करणार नाहीत का? कोरोनाचं कारण काढत मराठा समाजचा आवाज किंवा इतर समाजाचे आवाज दाबता येणार नाहीत. कोरोनाचं भांडवल करत मराठा आरक्षणाला मूठमाती देऊ नका, अशी विनंती दरेकर यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here