ठाकरे सरकारने पोलिस दलात बदल्यांचा बाजार मांडला – प्रविण दरेकर!

या सरकारमध्ये कोणतेही नियंत्रण नसून, पोलिस दलाचेी बदनामी झाली आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

98

सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे. ठाकरे सरकारने पोलिस दलात बदल्यांचाच बाजार मांडला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

यापेक्षा गंभीर काहीच नाही

पोलिस दलात होणाऱ्या बदली संदर्भात संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आज दस्तुरखुद्द आयपीएस अधिकारी संजय पांडे अगदी उद्विग्नपणे सांगतो माझ्यावर अन्याय झाला आहे. अशा प्रकारची भूमिका आयपीएस अधिकारी पत्राद्वारे करत असेल, यापेक्षा गंभीर काहीच असू शकत नाही, असे दरेकर यांनी सांगितले.

कोणाचा कोणाला मेळ नाही

मुंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्या नंतर हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, पुन्हा गतवैभवाचे दिवस आणायचे आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी करता कामा नये, असे म्हटले होते. या संदर्भात दरेकर म्हणाले की, राज्यसरकारला गृहखातं सांभाळण्यात अपयश आले आहे. पोलिस खात्यात कोणाचा कोणाला मेळ नाही, नियंत्रण नाही आणि त्यातून अशा प्रकारचे वाझे तयार होतात आणि संजय पांडे यांची स्टेटमेंट येते. गृहखात्यांचा व कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

(हेही वाचाः ‘या’ मुंबई पोलीस आयुक्तांची कारकीर्द ठरलेली वादग्रस्त!)

राज्य सरकार जबाबदार

राज्यात ठाकरे सरकार आल्यानतंर क्वारंटाईन सेंटर पासून हॉस्पिटल मध्ये बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडले. महिलांवर अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खून, दरोडे घातले जात आहेत. वाझेसारख्या खाकी वर्दी असलेल्या माणसांचा अनेक प्रकरणात समावेश आहे. या सरकारमध्ये कोणतेही नियंत्रण नसून, पोलिस दलाचेी बदनामी झाली आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.