प्रविण दरेकर यांचा Manoj Jarange Patil यांना इशारा; म्हणाले…

242
आशिष शेलार यांचा Manoj Jarange Patil यांना सवाल; म्हणाले...

मराठा समाजाने जो विश्वास जरांगे पाटलांवर दाखवलाय त्यातून अहंकार येता कामा नये. कारण ते आपल्या व समाजाच्या हिताचे नसून अहंकारातून ऱ्हास झाल्याची अनेक उदाहरणे पुढे आलीत. जरांगे यांचा द्वेष फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. ते आम्ही खपवून घेणार नाही आणि देवेंद्र फडणवीसांची संयमी भूमिका म्हणजे त्यांची दुर्बलता समजू नये, असा निर्वाणीचा इशाराच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी गुरूवारी (१८ जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांना दिला. (Manoj Jarange Patil)

दरेकर म्हणाले की, जरांगेंनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू केले त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस हेच राहिलेले आहेत. जसे काय फडणवीस हेच मराठा आरक्षणाला आडवे आहेत. त्यामुळेच ते कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे तो राबविताहेत की काय अशी भावना झाल्याचा आरोप करत, फडणवीसांचे मराठा समाजासाठी योगदान नाही का? मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम फडणवीसांनी केले. ते हायकोर्टात टिकवले, सुप्रीम कोर्टातही ते नाकारले गेले नाही. परंतु नंतर उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यावर त्यांच्या निष्काळजीपणामुळे आरक्षण गेले. परंतु त्यांना जाब विचारला गेला नाही आणि तेच आता आम्ही फडणवीसांची बाजू घ्यायला गेलो तर आम्हाला फडणवीसांचा रोग झाल्याचे सांगतात. मग तुम्हाला फडणवीस द्वेषाचा रोग झालाय का? असा सवालही दरेकर यांनी जरांगे यांना केला. (Manoj Jarange Patil)

(हेही वाचा – Chhattisgarh Naxalite: गडचिरोलीतील शेवटचे गाव जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नाही; तिथे नक्षलवाद्यांचे मोठे लाँच पॅड?)

फडणवीसांच्या संयमी भूमिकेला जरांगेंनी दुर्बलता समजू नये – दरेकर

दरेकर पुढे म्हणाले की, सरकार म्हणून जर आपण विचारत असाल तर शरद पवार या राज्यात अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात, मार्गदर्शनाखाली अनेक सरकारे होती. त्यांना आम्ही ते मराठा म्हणून कोणीच जाब विचारत नाही. उद्धव ठाकरे हेही या राज्याचे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. परंतु त्यांनाही तुम्ही जाब विचारला नाही. तेव्हा आंदोलन, आक्रमण केले अशा प्रकारचीही भूमिका कोणी घेतली नव्हती. मग तेव्हा प्रश्न नव्हते का..? असाही खडा सवाल त्यांनी जरांगे यांना विचारला. (Manoj Jarange Patil)

जरांगे म्हणतात देवेंद्र फडणवीस रक्तरंजित इतिहास रचत आहेत. गृहमंत्री असूनही त्यांच्याविषयी जरांगे वाटेल ते बोलताहेत. असे असतानाही फडणवीस किंवा सरकार सहन करतेय फक्त शांतता राहावी म्हणून, संयमी भूमिका फडणवीस घेत असतील तर ती त्यांची दुर्बलता जरांगेंनी समजू नये. जरांगेंचे आंदोलन मराठ्यांच्या प्रश्नासाठी आहे की फडणवीस यांना टार्गेट करून कुणासाठी राजकीय अजेंडा आपण चालवताय. यामागे बोलावता धनी कोण आहे हेही महाराष्ट्रातील जनतेला समजायला लागल्याचा इशाराही दरेकर यांनी दिला. (Manoj Jarange Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.