Badlapur Rape Case प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

संस्था चालकांविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

64

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार (Badlapur Rape Case) प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. तर दुसरीकडे चिमुकलींचा अत्याचार झालेल्या संबंधित शाळेच्या संस्था चालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला.

संस्था चालकांविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

बदलापूर येथे ऑगस्ट महिन्यात एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार (Badlapur Rape Case) झाला होता, ज्या शाळेत हा किळसवाणा प्रकार घडला, त्या शाळेचे अध्यक्ष आणि विश्वस्तांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी १ ऑक्टोबरला सुनावणी झाली. बदलापूर घटनेनंतर पोलिसांनी संस्था चालकांविरोधातदेखील पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस अद्याप ट्रस्टींना अटक केलेली नाही. ट्रस्टींची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे‌. बदलापूर प्रकरणातील (Badlapur Rape Case) मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत स्यु मोटो याचिका दाखल करून घेतली, त्यांच्यावरदेखील सुनावणी सुरू आहे.

(हेही वाचा Congress : पवार आणि ठाकरेंकडे फक्त सहानुभूतीच; उमेदवारीसाठी मात्र इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडेच)

अक्षय शिंदेच्या डोक्यातच का गोळी मारण्यात आली. पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर असे सवाल न्यायालयाने विचारले. तीन गोळ्या झाडल्या तर उरलेल्या दोन कुठे गेल्या? चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली, त्याला लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला.  न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते, असा पहिला सवाल केला. यावर सरकारी वकिलांनी ते पिस्तूल होते असे सांगताच न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.