धक्कादायक! भायखळ्याच्या सेंट अँड्र्यूज शाळेकडून उन्हाळी सुटीत ख्रिस्ती धर्मप्रसार

162

मुंबईतील भायखळा येथील सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या वतीने चालवल्या जाणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १२ ते २२ मे २०२२ या कालावधीत ‘मे २०२२ समर कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘व्हेकेशन बायबल स्कूल’ या नावाने बायबल शिकवले जात आहे. सध्या शाळेला उन्हाळी सुटी असल्यामुळे शाळा बंद असली तरी या शाळेचा आता ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी वापर होत आहे का, अशी शंका आता येऊ लागली आहे. याला हिंदू जनजागृती समितीने विरोध केला आहे. या ठिकाणी बायबल शिकण्यासाठी शाळेने हिंदूंनाही आवाहन केले आहे. त्याऐवजी शाळेने हिंदू विद्यार्थ्यांसाठी भगवद् गीता शिकवावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

हिंदु विद्यार्थ्यांवर बायबलची सक्ती कशासाठी?

ख्रिस्ती विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याविषयी आमचा कोणताही आक्षेप नाही, मात्र या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हिंदु आहेत. असे असतांना हिंदु विद्यार्थ्यांवर बायबलची सक्ती कशासाठी? भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. राज्यघटनेतील भा.दं.वि. कलम २५ नुसार प्रत्येकाला स्वत:च्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या शाळेत केवळ बायबल शिकवले जाणे म्हणजे एक प्रकारे ख्रिस्ती विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य धर्मातील विद्यार्थ्यांनाही बायबल शिकवण्यास प्रवृत्त करण्यासारखे आहे. हा प्रकार राज्यघटनेतील कलम २५ चे उल्लंघन करणारा आहे. याविषयी काही हिंदु विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीही आमच्याकडे आल्या आहेत. हा विषय धर्मभावनांशी जोडलेला असल्यामुळे आपण तात्काळ लक्ष घालून हा प्रकार रोखावा, असे समितीने म्हटले आहे.

(हेही वाचा आनंद दिघेंच्या मृत्यूवर आजही विचारला जातोय प्रश्न, गूढ कायम!)

धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात 

सेंट अँड्र्यूज मराठी चर्चद्वारे चालवली जाणारी शाळा ही खासगी असली आणि चर्चकडून चालवली जात असली, तरी या शाळेत येणारे बहुसंख्य विद्यार्थी हिंदु आहेत. या सर्व विद्यार्थ्याकडून शैक्षणिक शुल्क घेतले जाते, मात्र धार्मिक शिक्षण केवळ बायबलचे दिले जाते. विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देऊन संस्कारित करण्याचा सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या शाळेचा हेतू प्रामाणिक असेल, तर त्यांनी बहुसंख्य हिंदु विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्मानुसार भगवद्गीता शिकवण्याची व्यापकपता दाखवायला हवी. तसे न करता सरसकट सर्व धर्मीय विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याचा प्रकार आक्षेपार्ह आहे. असे करणे म्हणजे शाळेतील अन्य धर्मीय विद्यार्थ्यांना बायबल शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यासारखे आहे. शाळेच्या बाहेर लावलेल्या फलकावर बायबल सर्व धर्मीय विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. हा प्रकार राज्यघटनेच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, असेही म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.