इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी; Prem Shukla यांचा हल्लाबोल

139
इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी; Prem Shukla यांचा हल्लाबोल

कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही मंडळी एक शब्दही काढत नाहीत. अशा बलात्काऱ्यांच्या, लव्ह जिहाद्यांच्या विरोधात लढण्याचा भारतीय जनता पार्टी चा निर्धार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला (Prem Shukla) यांनी शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. विशिष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधीत, विशिष्ट धर्माशी संबंधीत बलात्कारींना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुलेआम पाठीशी घालत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन देण्याबाबत इंडी आघाडीने मौन बाळगले आहे, अशा शब्दांत शुक्ला यांनी इंडी आघाडीवर हल्लाबोल केला.

शुक्ला (Prem Shukla) यांनी सांगितले की, बलात्काऱ्यांना संरक्षण देऊन पश्चिम बंगालला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बलात्कारी राज्य केले आहे. वर्षोनवर्षे अशा बलात्काराच्या निंदनीय घटना पश्चिम बंगालमध्ये होत आहेत, मात्र या प्रकरणांत बलात्कारी गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासंदर्भात इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांचे मौन हे बरेच काही सांगते. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या विरोधात आवाज उठविणाऱ्या सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. यावेळी शुक्ला यांनी पश्चिम बंगालमधील विशिष्ट धर्माच्या गुन्हेगारांच्या नावाची यादीच सादर केली.

(हेही वाचा – शहरी भागात बचतगटांची संख्या वाढवावी; CM Eknath Shinde यांचे निर्देश)

इंडी आघाडीविरोधात यामुळे नागरिकांमध्ये रोष 

यावेळी शुक्ला (Prem Shukla) यांनी सांगितले की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राक्षसी बलात्कार केलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे वक्तव्य करतात. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी, इंडी आघाडीच्या नेत्यांना बलात्काऱ्यांबाबत ममता आहे. इंडी आघाडीला पिडीत महिलांबाबत जरासुद्धा कणव नाही. विशिष्ट धर्माचे लोक अपराधी असल्यानंतर पीडितांना न्याय देण्याऐवजी ही मंडळी बलात्कारी, गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. इंडी आघाडी ही बलात्कारी बचाव आघाडी असून त्यांच्या मुस्लिम अपराध्यांना पाठीशी घालण्याच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये रोष निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मविआ म्हणजे मजहबी, व्यभिचारी आणि अपराधी आघाडी असून या आघाडीचे उद्धव ठाकरे व अन्य नेते लव जिहाद करणाऱ्यांचे संरक्षक आहेत, अशा शब्दांत शुक्ला यांनी मविआच्या नेत्यांवर घणाघात केला. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे दोघेही पीडित महिलांच्या बाजूने उभे न राहता मुस्लीम अपराधींना वाचवण्याचा हीन प्रयत्न करतात. भाजपा मात्र बलात्काऱ्यांविरोधात, लव्ह जिहादींच्या विरोधात उभी राहणार अशी ग्वाहीही शुक्ला (Prem Shukla) यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.