
दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election ) आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जोरदार धक्का बसला. या निवडणुकीत भाजपाला (BJP) ऐतिहासिक विजय मिळाला. यानंतर दिवसेंदिवस ‘आप’च्या अडचणीत वाढ होत आहे. कारण १३०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी गृह मंत्रालयाने आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास मान्यता दिली आहे. दिल्लीतील (Delhi) सरकारी शाळांमध्ये वर्गखोल्या बांधताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. काही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
( हेही वाचा : BMC : राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला महापालिकेच्या कामांचा आढावा)
२०२२ मध्ये दिल्ली सरकारच्या दक्षता आयोगाने कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची शिफारस केली होती आणि मुख्य सचिवांना अहवाल सादर केला होता. त्यातच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कालावधीत मंत्रिपदावर असताना मनीष सिसोदीया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी केलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी राष्ट्रपतींनी देखील मान्यता दिली आहे. (Manish Sisodia)
केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) त्यांच्या १७ फेब्रुवारी २०२० च्या रिपोर्टमध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दिल्ली सरकारी शाळांमध्ये २४०० हून अधिक वर्गखोल्यांच्या बांधकामात स्पष्टपणे अनियमितता आढळून आल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनीष सिसोदीया (Manish Sisodia) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community