नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून अवघा देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं देखील गंभीर दखल घेतली; पण अद्याप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलेलं नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आपल्या अभिभाषणात यावर भाष्य केलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांना एकत्रितरित्या संबोधित करताना त्यांनी या मुद्द्यावर सरकारच्यावतीनं भूमिका मांडली.
राष्ट्रपती म्हणाल्या, “सरकारचा हा सातत्यानं प्रयत्न आहे की, देशातील तरुणांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची योग्य संधी मिळावी. सरकारी भरती असो किंवा परीक्षा यामध्ये कोणत्याही कारणानं जर अडथळे येणं हे योग्य नाही. यामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता अत्यंत गरजेची आहे. अलिकडेच झालेल्या काही पेपर लीकच्या घटनांची निष्पक्ष चौकशी आणि दोषींना कडक शिक्षा देण्यासाठी माझं सरकार प्रतिबद्ध आहे. यापूर्वीही आपण पाहिलंय की अनेक राज्यांमध्ये पेपर लीकच्या घटना घडल्या आहेत.”
#WATCH | President Droupadi Murmu says, “It is a continuous effort of the Government to ensure that the youth of the country gets adequate opportunity to display their talent…My government is committed to a fair investigation of the recent incidents of paper leaks as well as… pic.twitter.com/fJpnBONP0c
— ANI (@ANI) June 27, 2024
(हेही वाचा – BEST : बेस्ट कर्मचाऱ्यांची बेस्ट कामगिरी; स्कूलबसच्या अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना अशी केली मदत)
परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांविरोधात कठोर कायदा
यावर राजकारणापेक्षा वेगळा विचार करत त्यावर ठोस उपाय करण्याची गरज आहे. संसदेनंदेखील परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांविरोधात एक कठोर कायदा केला आहे. सरकार परीक्षांशीसंबंधित संस्था, त्यांच्या कामकाजाचे प्रकार, परीक्षा संबंधिची प्रक्रिया यामध्ये मोठी सुधारणा करण्याच्या दृष्टीनं काम करत आहे, असंही यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community