President Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी ‘या’ 11 उमेदवारांचे अर्ज दाखल, एकाचा अर्ज रद्द

92

भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आणि विरोधक राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचा शोध घेत असतानाच देशातील 11 जणांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी बहुतांश हौशी उमेदवार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रपती पदासाठी कोणी केले अर्ज दाखल

1. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू,

2. जीवन कुमार मित्तल, दिल्ली,

3. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई,

4. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई,

5. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू,

6. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार,

7. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली,

8. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली,

9. लालू प्रसाद यादव, बिहार,

10. ए. मणिथन, तामिळनाडू,

11. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश

तामिळनाडूमधील डॉ. के. पद्मराजन हे होमिओपॅथिक डॉक्टर असून व्यावसायिक आहेत. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. मात्र, हे नाव ‘सर्वाधिक अपयशी’ उमेदवार म्हणून नोंदवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?)

निवडणुकीसाठी एका दाम्पत्याने अर्ज दाखल

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एका दाम्पत्याने अर्ज दाखल केला आहे. मोहम्मद ए हामिद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल असे या दाम्पत्याचे नाव असून ते मुंबईतील आहेत. या दाम्पत्याने यापूर्वी 2017 मध्ये देखील निवडणूक अर्ज दाखल केला होता. यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे. दिल्लीतून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यात उद्योगपती जीवन कुमार मित्तल यांच्या नावाचा समावेश आहे. जीवन कुमार मित्तल यांनी आतापर्यंत राष्ट्रपतींना 5 हजारांहून अधिक पत्रे लिहिली आहेत. याच कारणामुळे ते प्रसिद्धही आहेत. वर्ष 2012 आणि 2017 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

11 उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द

राष्ट्रपती पदासाठी बुधवारी अर्ज दाखल केलेल्या 11 उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चूक झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक म्हणून प्रत्येकी 50 आमदार, खासदारांची स्वाक्षरी हवी असते. त्यामुळे छाननीमध्ये या सर्वांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.