राष्ट्रपती येणार दुर्गराज रायगडाच्या भेटीला…

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडला पुढील महिन्यात भेट देणार आहेत. संभाजी राजेंनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगडाला भेट देण्यासाठी निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचा स्वीकार करत,  राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला किल्ले रायगडला भेट देणार आहेत. असं ट्विट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन केले आहे.

काय म्हणाले संभाजीराजे

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे. असं संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच स्वराज्याची राजधानी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी सजणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होणार आहे.

दिले होते रायगड भेटीचे निमंत्रण 

मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.

 ( हेही वाचा : अन् पाण्याच्या पाईपमधून पडू लागल्या चक्क नोटा )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here