Presidential Election: भाजपतर्फे मोर्चेबांधणी सुरू, ‘या’ 2 नेत्यांवर सोपवली जबाबदारी

136

देशात राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोदाने सुरू केली आहे. केंद्रातील भाजप सरकारसह देशातील इतर विरोधी पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे बघायला मिळत आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपकडून जगतप्रसाद नड्डा आणि राजनाथ सिंह या दोन नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून या दोन नेत्यांवर भाजपने मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजप जो कोणता उमेदवार देईल, तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा झेंडा हाती घेऊन येईल असे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – “अजितदादा परत आमच्यासोबत या”, भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिली साद!)

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले आहे. कोविंद यांना राष्ट्रपतीपदी विजयी करून भाजपने देशभरातील दलित समुदायाला एक संदेश दिला होता. त्यामुळे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या घोषणेकडे लागले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. ही बैठक झाल्यानंतरच भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. इतकेच नाहीतर यावेळी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.