राज्यसभेच्या 16 जागांकरता 4 राज्यात 10 जून रोजी मतदान होणार आहे. या चार राज्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. यादरम्यान गुरूवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीची तारीख देखील करण्यात आली आहे. त्यामुळे देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै 2022 दिवशी संपणार असल्याने आज, गुरूवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यकाल 2022 दिवशी संपणार आहे, त्यानंतर निवडणूक बिनविरोध न झाल्यास नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी 18 जुलै दिवशी निवडणूक होणार आहे तर 21 जुलै रोजी मतमोजणी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
Voting for Presidential elections to be held on 18th July, counting of votes on 21st July: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/bTvawdiE9I
— ANI (@ANI) June 9, 2022
21 जुलै रोजी देशाच्या पुढील आणि 15 व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्च पदी निवड होत आहे. अखेरच्या निवडणुका 17 जुलै 2017 रोजी झाल्या होत्या. या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे सदस्य लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतात. दरम्यान नव्याने राष्ट्रपती होण्यासाठी काही नावे चर्चेत आहे. विशेष म्हणजे यामध्ये चारही महिला असल्याने पुढच्या राष्ट्रपती या महिला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये चर्चेत असणारी नावे…
- माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन
- उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल
- छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके
- तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराज
- झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू
Join Our WhatsApp Community