राष्ट्रपती निवडणूक : मतपेटी दिल्लीच्या दिशेने रवाना

74

महाराष्ट्र विधानभवनातील सेंट्रल हॉल येथील मतदान केंद्रात सोमवारी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ५ वाजता पूर्ण झाली. त्यानंतर मतपेटी (बॅलेट बॉक्स) आणि इतर आवश्यक निवडणूक साहित्य सीलबंद करुन ते सुरक्षेमध्ये वाहनाद्वारे सायंकाळी मुंबई विमानतळाकडे रवाना करण्यात आले. तेथून रात्री ९.५५ वाजताच्या विमानाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतपेटी दिल्लीकडे रवाना होईल.

( हेही वाचा : खासदार फुटीच्या चर्चा; एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार)

मतपेटी दिल्लीच्या दिशेने रवाना

मतपेटी सुरक्षितरित्या विमानतळाच्या दिशेने पाठविताना केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल, केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एस. बी. जोशी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, दोन्ही राजकीय पक्षांकडील पोलिंग एजंट आमदार श्रीकांत भारतीय, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.