18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून संसद भवनात मतगणना सुरु झाली. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (NDA Presidential candidate Draupadi Murmu) यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
( हेही वाचा: एकनाथ शिंदेंचे पुढील लक्ष्य, शिवसेना प्रतिनिधी सभेतील १८८ सदस्य? )
द्रौपदी मुर्मू आघाडीवर
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत आहे. मतमोजणी सुरु झाली असून, या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आघाडीवर आहेत. खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. खासदारांच्या एकूण 748 मतांपैकी मुर्मू यांना 540 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना फक्त 208 मते मिळाली आहेत. त्यातील 15 खासदारांची मते बाद ठरली आहेत.
Join Our WhatsApp Community