राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठा विजय मिळवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांचे ट्विटद्वारे अभिनंदन करताना म्हटले की, आदिवासी समाजाची मुलगी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्याने भारताने इतिहास लिहिला आहे. द्रौपदी मुर्मूंचे जीवन एक आदर्श असून त्यांचे यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देईल. त्या नागरिकांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास आल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान?
ज्यावेळी 1.3 अब्ज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहेत, अशा वेळी पूर्व भारतातील दुर्गम भागातील आदिवासी समाजात जन्मलेली भारताची मुलगी आमची राष्ट्रपती म्हणून निवडून आली आहे. या विजयाबद्दल द्रौपदी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन.
I would like to thank all those MPs and MLAs across party lines who have supported the candidature of Smt. Droupadi Murmu Ji. Her record victory augurs well for our democracy.
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2022
पंतप्रधान मोदी म्हणाले की, द्रौपदी मुर्मू या एक उत्तम आमदार आणि मंत्री राहिल्या आहेत. झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ गौरवशाली राहिला आहे. मला खात्री आहे की, त्या एक उत्कृष्ट राष्ट्रपती ठरतील, ज्या स्वतः पुढे येऊन देशाचे नेतृत्व करतील आणि भारताचा विकास प्रवास आणखी मजबूत करण्यास मदत करतील. ते म्हणाले की, मी पक्षाच्या बाहेरील सर्व खासदार आणि आमदारांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. त्यांचा विजय हा आपल्या लोकशाहीसाठी चांगला संकेत आहे.
Met Smt. Droupadi Murmu Ji and congratulated her. pic.twitter.com/ALdJ3kWSLj
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2022
मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदन
द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट केले. भारतीय प्रजासत्ताकच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी_मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community