राज्यात राजकीय परिस्थिती आता अस्थिर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिल्यानंतर या कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा मुठ बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आता मनसेच्यावतीने प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. या सदस्यत्व नोंदणीला आता प्रारंभ झाला असून आता प्रत्येक मनसैनिक हा मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक असे म्हणत मनसेची बांधणी केली जाणार आहे.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात
राज्यातील शिवसेना पक्ष फुटलेला असून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी आहे. तर काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व सिध्द करण्याच्या तयारीत नेतृत्वाच्या शोधात आहे. त्यामुळे मुंबईतील अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा मनसेला होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे काहिसे लांब राहणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या सभेत सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.
( हेही वाचा : मालाडमध्ये ‘सीआरझेड’ क्षेत्रात कोणाच्या आशीर्वादाने स्टुडिओ उभारले? – भातखळकरांचा ‘मविआ’ला सवाल)
मनसे अध्यक्षांच्या निर्देशानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली जहात असून याचा भागा म्हणून प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात केली जात आहे. यासाठी मनसेने ८८६०३००४०४ हा मोबाईल क्रमांक दिला असून यावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन केले आहे.
या सदस्य नोंदणीकरता मनसेच्यावतीने संपूर्ण मुंबईसह राज्यात फलक लावून त्यावरील क्युआर कोड किंवा त्यावर नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास त्याआधारे क्यू आर कोड उपलब्ध करून देत त्याद्वारे अर्ज भरुन घेण्याची प्रक्रीया राबवली जाईल. त्यामुळे प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मनसैनिकांना केले आहे.
Join Our WhatsApp Community