नागपूर-बिलासपूर ‘वंदेभारत एक्सप्रेस’ला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

118

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या नागपूर-बिलासपूर ‘वंदेभारत एक्सप्रेस’ला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मध्यरेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर हा सोहळा पार पडला.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वांदेभारत एक्सप्रेस ठरली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई सेंट्रल -अहमदाबाद ही देशातील तिसरी व महाराष्ट्रातील पहिली वंदेभारत एक्सप्रेस धावली होती. स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची साक्ष आणि मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग आहे.

नागपूर-बिलासपूर ‘वंदेभारत एक्सप्रेस’ गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहर जोडली जाणार आहेत. नागपूर ते बिलासपूर एकूण अंतर ४१२ कि.मी. असून, ही गाडी ५.३० तासांत हे अंतर कापेल. आठवड्यातून ६ वेळा धावणार वंदेभारत एक्सप्रेस धावणार आहे.

गाडीची वैशिष्ट्ये

  • नागपूर-बिलासपूर ‘वंदेभारत एक्सप्रेस’ला एकूण १६ कोच असून, प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी ३२ इंचीच्या डिजिटल स्क्रिन लावण्यात आले आहेत.
  • विमान प्रवासाची प्रचिती घेतानाच ‘कवच’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या एक्सप्रेस गाडीत सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांची माहिती आणि इंफोटेनमेंट उपलब्ध.
  • दिव्यांग प्रवाश्यांची काळजी घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी ब्रेल लिपीतून माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत.
  • टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम प्रसाधनगृह, उच्च कार्यक्षमतेच्या कंप्रेसरद्वारे उत्कृष्ट वेंटिलेशन आणि वातानुकूलन नियंत्रण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.