पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ‘या’ दिग्गजांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

128

देशात मोठ्या उत्साहाने दिवाळी हा सण साजरा केला जात आहे. याच निमित्ताने देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा : वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले; अनेक गाड्या रद्द)

पंतप्रधानांनी ट्वीट करत दिल्या शुभेच्छा…

दिवाळीचा संबंध हा प्रकाश आणि आनंदाशी आहे. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा घेऊन येवो. तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य घेऊन लाभो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी… लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा…असे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो अशाप्रकारे गृहमंत्री अमित शहांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.