देशात मोठ्या उत्साहाने दिवाळी हा सण साजरा केला जात आहे. याच निमित्ताने देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
( हेही वाचा : वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले; अनेक गाड्या रद्द)
पंतप्रधानांनी ट्वीट करत दिल्या शुभेच्छा…
दिवाळीचा संबंध हा प्रकाश आणि आनंदाशी आहे. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा घेऊन येवो. तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य घेऊन लाभो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
दीपावली की आप सभी को ढेरों शुभकामनाएं। प्रकाश का यह पर्व हर किसी के जीवन में खुशियां और उत्तम स्वास्थ्य लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा
उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी… लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा…असे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी…
लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा…
दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा….#दीपावली #दिवाळी #Diwali #Diwali2022 pic.twitter.com/Xnn4cMXAoR
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 24, 2022
गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो अशाप्रकारे गृहमंत्री अमित शहांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
समस्त देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं।
प्रकाश का यह पर्व सभी के जीवन में खुशियां, आरोग्य व समृद्धि लाए। pic.twitter.com/iTFUoddlm9— Amit Shah (@AmitShah) October 24, 2022
तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥आज #लक्ष्मीपूजन !
दीपावलीचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दीचा प्रकाश घेऊन येवो!
लक्ष्मीपूजनाच्या अनेक अनेक शुभेच्छा!Wishing you all a very bright, #HappyDeepavali ! pic.twitter.com/1t9tVLp3oy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2022
Join Our WhatsApp Community