Narendra Modi : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना, ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये विशेष सहभाग

129
Narendra Modi : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना, ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये विशेष सहभाग

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सायरील रॅमफोसा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ब्रिक्स शिखर परिषदेसाठी खास आमंत्रण देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जोहानिसबर्गमध्ये होणाऱ्या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’त सहभागी होतील. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर देशांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबाबत –

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २२ ते २४ ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. या परिषदेमध्ये काही देशांच्या नेत्यांसोबत पंतप्रधान द्विपक्षीय बैठक करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यानंतर ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांच्या निमंत्रणामुळे पंतप्रधान मोदी हे ग्रीसचा देखील दौरा करणार आहेत. तब्बल ४० वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान हे ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

(हेही वाचा – Dhananjay Munde : आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा)

दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती जिनपिंगसोबत बैठक होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्याविषयी परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. यादरम्यान परराष्ट्र सचिवांना विचारण्यात आले की, ‘या परिषदेदरम्यान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार का?’ यावर परराष्ट्र सचिव क्वात्रा यांनी सांगितले की, ‘पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे.’ जर दक्षिण आफ्रिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक झाली तर, मे २०२० पासून सुरु असलेल्या पूर्व लडाखमधील सीमावादानंतरची दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक असेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.