भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सायंकाळी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही ट्विट करत डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Dr. Manmohan Singh)
India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji. Rising from humble origins, he rose to become a respected economist. He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic… pic.twitter.com/clW00Yv6oP
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2024
पंतप्रधान मोदी शोक व्यक्त करत म्हणाले, “देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आज भारत शोक व्यक्त करत आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.” (Dr. Manmohan Singh)
हेही वाचा- NEP मध्ये आणि वाचन चळवळीवर विशेष लक्ष केंद्रीत करणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे लिहिले, “डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती…” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. (Dr. Manmohan Singh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community