पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) आज म्हजेच मंगळवार ९ जानेवारी रोजी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी ते व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तसेच ते आज संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत रोड शो करतील. (Prime Minister Modi)
(हेही वाचा – Corona JN.1 update : राज्यात JN.1 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत ; पुण्यात सर्वाधिक १५० रुग्ण)
व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेशी माझा खूप जवळचा संबंध –
अहमदाबादला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी एक्स हँडलवर आपला आनंद व्यक्त केला. “मी काही वेळापूर्वी अहमदाबादला पोहोचले. पुढील दोन दिवसांमध्ये मी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद आणि संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होईन. शिखर परिषदेदरम्यान अनेक जागतिक नेते उपस्थित राहतील ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोहम्मद बिन झायेद याचे आगमन खूप खास आहे. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेशी माझा खूप जवळचा संबंध आहे. या मंचाने गुजरातच्या विकासात कसे योगदान दिले आहे आणि अनेक लोकांसाठी संधी निर्माण केल्या आहेत हे पाहून मला आनंद झाला आहे.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Prime Minister Modi)
Landed in Ahmedabad a short while ago. Over the next two days, will be taking part in the Vibrant Gujarat Summit and related programmes. It is a matter of immense joy that various world leaders will be joining us during this Summit. The coming of my brother, HH @MohamedBinZayed… pic.twitter.com/Ygaajg4TfM
— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2024
(हेही वाचा – MLA Disqualification Case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी बातमी, ‘या’ दिवशी होऊ शकतो निर्णय)
पंतप्रधान मोदींचा रोड शो –
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर रोड शो करणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचे स्वागत केल्यानंतर संध्याकाळी विमानतळावरून तीन किलोमीटरचा रोड शो सुरू होईल, असे अहमदाबाद शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) सफीन हसन यांनी सांगितले. रोड शो इंदिरा ब्रिजवर संपेल. हा पूल अहमदाबादला गांधीनगरशी जोडतो. यानंतर दोन्ही मान्यवर गांधीनगर येथील आपापल्या गंतव्यस्थानासाठी रवाना होतील. (Prime Minister Modi)
पंतप्रधान मोदी साधणार उद्योजकांशी संवाद –
गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये व्ही. जी. जी. एस. च्या दहाव्या आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांच्या हस्ते बुधवारी (१० जानेवारी) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी मंगळवार ९ जानेवारी रोजी सकाळी गांधीनगर येथील महात्मा मंदिरात पोहोचतील. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांची भेट घेतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतील. ते गिफ्ट सिटीला जातील. संध्याकाळी ५:१५ वाजता ते ग्लोबल फिनटेक लीडरशिप फोरममध्ये उद्योजकांशी संवाद साधतील. (Prime Minister Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community