राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल

301
राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२७ जून) रोजी भोपाळ येथे भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र म्हणाले की, असे एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि यांचे आणखी घोटाळे बाहेर काढायला हवेत. बुथ कार्यकर्ते जी मेहनत घेतात त्याची पूर्ण माहिती मला मिळत असते, असेही मोदी यांनी सांगितले.

(हेही वाचा – World Cup 2023 : प्रत्येकाने विराट कोहलीसाठी हा विश्वचषक जिंकायलाच हवा – वीरेंद्र सेहवाग)

तुमच्या मुला-मुलींचं भलं करायचं असेल तर भाजपाला मतदान करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्हाला गांधी परिवारातल्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा. तुम्हाला मुलायमसिंह यादव यांच्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही समाजवादी पार्टीला मतदान करा. तुम्हाला लालू प्रसाद यादव यांच्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रीय जनता दलाला मतदान करा. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. तुम्हाला अब्दुल्ला परिवारातील मुला-मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सला मतदान करा. तुम्हाला के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही बीआरएसला मतदान करा. तुम्हाला करुणानिधी यांच्या मुला-मुलीचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही डीएमकेला मतदान करा. परंतु माझ्या एका गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला जर तुमच्या मुला-मुलींचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपाला मतदान करा.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.