मागील अनेक दिवसांपासून अटल सेतूची चर्चा सुरु आहे. या सेतूसाठी जेवढी वायर लावले आहे, त्यातून पृथ्वीच्या २ प्रदक्षिणा होतील, जेवढे पोलाद लागले आहे त्यातून ४ हावडा ब्रिज तयार होतील. हा सेतू पूर्ण होण्याचा संकल्प जपानचे तत्कालीन पंतप्रधान स्व. आबे यांच्या सोबत आम्ही दोघांनी केला होता, आज त्यांचे स्मरण करावे लागेल. हा सेतू विकसित भारताची झलक आहे. अंतर कमी होईल, शहरांचे कोपरे जोडले जातील. १० वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची चर्चा व्हायची, आज कोट्यवधींच्या प्रकल्पांची चर्चा होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसच्या राजवटीशी तुलना केली.
मागील सरकारच्या काळात वर्षानुवर्षे प्रकल्पांचे काम सुरू असायचे, मोठे प्रकल्प जिवंतपणी पूर्ण होतील का, अशी शंका लोकांना तेव्हा वाटायची, त्यावेळी आपण सांगितले होते की, देश बदलणार, ती तेव्हा मोदींची गॅरेंटी होती. हा अटल सागरी सेतू प्रकल्प आपण मुंबा देवी, श्री सिद्धिविनायक याना वंदन करून अर्पण करत आहे. आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प हा नवनिर्माणासाठीअसतो. रायगड या तिसऱ्या मुंबईसाठी ३३ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. महिला सशक्तीकरणासाठी लेक लाडकी योजनासारख्या योजना आणल्या आहेत. विकसित भारताच्या निर्मतीसाठी नारी शक्ती पुढे येणे महत्वाचे आहे. त्यांच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करणे आमचा प्रयत्न आहे. येत्या वर्षभरात २ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष ठेवले आहे, असे PM Narendra Modi म्हणाले.
अनेक दशकांपासून कर दात्यांचे पैसे कुठे जातात हेच कळत नसायचे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अनेक वर्षे रखडून होता, आम्ही त्याचा पहिला टप्पा सुरु केला. अटल सेतूच्या तुलनेत ५ पट छोटा असलेले वांद्रे – वरळी सागरी सेतू पूर्ण करण्यासाठी काँग्रेस सरकारने १० वर्षे लावले, आम्ही अटल सेतू त्याही पेक्षा कमी वर्षात पूर्ण केला. मागील सरकारची नियत आणि निष्ठा सत्ता आणि परिवाराप्रती असायची आमची नियत आणि निष्ठा देशाच्या विकासाप्रती असल्यामुळे मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. २०१४ पूर्वी १० वर्षात पायाभूत सुविधांसाठी आधीच्या सरकारने १२ लाख कोटींचे बजेट दिले आम्ही ४४ लाख रुपयांचे बजेट दिले, असे PM Narendra Modi म्हणाले.
Join Our WhatsApp Community