‘ऑपरेशन गंगा’ला प्रांतवादाशी जोडले जाणे चुकीचे! पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल 

137

देशाचा नागरिक देशहिताच्या दिशेने काम करत आहे. देशाचा सामान्य नागरिक राष्ट्रनिर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण काही जण स्वतःची राजकीय पातळी घसरवत आहेत. कोरोना काळात  लसीकरण मोहिमेचे जगभरात कौतुक होत होते, पण हे लोक गैरसमज पसरवत राहिले, युक्रेनमध्ये फसलेल्या देशातील नागरिकांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु असताना हेच लोक तिथे अडकलेल्या भारतीय मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढवत होते, ऑपरेशन गंगा’ लाही प्रांतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक कार्याला प्रांतवाद, संप्रदायवाद, जातीयवादाशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे, हे धोक्याचे आहे, असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मलवडी यांनी सुनावले.

पंजाबात भाजप मोठी शक्ती बनेल

पंजाबमध्ये विपरीत परिस्थितीत कार्यकर्त्यांनी जे काम केले, ते पाहता येणाऱ्या काळात भाजप एक शक्ती म्हणून विकसित होईल. पंजाबला विघटनावादी घटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भाजप कार्यकर्ता कसोसिने प्रयत्न करील, हा विश्वास मी पंजाबच्या जनतेला देतो. जेव्हा जग कोरोना सारख्या महामारीशी लढत होते, या वातावरणात निवडणूक झाली, त्यात भर म्हणून युद्ध सुरु झाले. त्यामुळे जगभरातील दळणवळण बिघडले आहे, युद्धाने अधिक परिणाम केला. याही परिस्थितीत भारताने आर्थिक स्तरावर जे निर्णय घेतले, त्यामुळे भारत यातून तारुण गेला. आमची ध्येयधोरणे जमिनीशी जोडलेल्या आहेत, म्हणून भारत तग धरू शकला. सध्या जे युद्ध सुरु आहे, त्याचा प्रभाव जगभरातील प्रत्येक देशावर झाला आहे, भारत शांतीच्या बाजूने आहे, पण जे देश थेट युद्ध लढत आहे, त्या देशांशी भारताचे व्यावहारिक संबंध आहेत, त्यामुळे भारतात खाद्य तेल महागले, कोळसा महागला आहे, जगभरात महागाई वाढली आहे. या जागतिक संकटात यावेळीच्या अर्थसंकल्पावर नजर टाकली, तर देश आत्मनिर्भर दिशेने पुढे जात आहे. जगभरात निर्माण झालेल्या अनिश्चित वातावरणात भारताच्या जनतेने दूरदृष्टीचा परिचय दिला आहे, भारताच्या मतदारांनी ज्या प्रकारे स्थिर सरकारसाठी मतदान केले हे भारतीयांच्या रक्तात लोकशाही आहे, हे दिसत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा Uttar Pradesh Election Result 2022: एकाही मुसलमानाला उमेदवारी न देता भाजपाने फडकावला भगवा)

२०२२ च्या निकालांनी २०२४ चा निकाल निश्चित झाला 

प्रत्येक योजना प्रत्येक गरिबांपर्यंत शत प्रतिशत पोहचवण्यात येईल, असे आपण जाहीर केले होते. त्याप्रमाणे आम्ही गरिबांपर्यंत योजना पोहचवली. या निकालांमुळे स्पष्ट केले आहे की, देशाच्या विकासासाठी आता राजकारणातील जुने-पुराणे विचार फेकून दिले पाहिजे आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली पाहिजे. उत्तर प्रदेशातील राजकारणी अनेक दशके उत्तर प्रदेशकडे जातीयतेच्या दृष्टीकोनातून पाहत होते, असे करून ते त्या जातीच्या नागरिकांचा अपमान करायचे आणि उत्तर प्रदेशचाही अपमान करायचे, काही लोक सांगायचे की, इथे निवडणुकीत फक्त जातच चालते, पण २०१४, २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीचा निकाल पाहिला, तर उत्तर प्रदेशातील जनतेने कायम विकासाचा मुद्दा स्वीकारला आहे. येथील प्रत्येक नागरिकाने दिले आहे की, जात ही देश तोडायला नाही, तर जोडायला आहे. २०१९च्या निवडणुकीच्या निकालानंतर काही विचारवंतांनी म्हटले होते की, २०१९चा विजय हा २०१७मध्ये ठरला होता, मी म्हणतो हे विचारवंत आता म्हणतील की, २०२२ च्या निकालांनी २०२४ चा निकाल निश्चित झाला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.