पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातच नाहीतर जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या प्रसिद्धीमुळे मोदींना लोकप्रिय ग्लोबल लीडर्सच्या यादीत स्थान मिळाले आहे. जगभरातील ७६ टक्के लोकांनी मोदींना जगातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय जागतिक नेता म्हणून मत दिले आहे. या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ४१ टक्के मते मिळवून सातव्या स्थानी आहेत.
( हेही वाचा : पुण्यातील व्यवसायिकांचे हसन मुश्रीफ कनेक्शन; ईडीची मोठी कारवाई )
पंतप्रधान मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते
ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ३४ टक्के मते मिळाली असून ते तेराव्या स्थानी आहेत. बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टने त्यांचे नवे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, जो बायडन, ऋषी सुनक, लोपेज ओब्राजोर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. बिझनेस इंटेलिजन्स कंपनीने २२ मार्च ते २८ मार्च दरम्यान हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना सर्वाधिक मते मिळाली असून सर्वेक्षणानुसार त्यांचे वर्णन सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर हे असून त्यांना ६१ टक्के मते मिळाली आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ५५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत.
Join Our WhatsApp Community