पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि सप्टेंबर २०१४ मोदींनी पहिला अमेरिका दौरा केला. त्यानंतर आजवर मोदींनी अनेकदा अमेरिका दौरा केला. या आठ वर्षाच्या काळात अमेरिकेत सत्तांतर झालं. मात्र तरीही पंतप्रधान मोदींचे अमेरिकेशी असलेले संबंध कायम चांगलेचं राहिले आणि याच संबंधाचा भारतालाही फायदा झाला. आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत हा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे.
मोदींचा सहावा अमेरिका दौरा
२०१४ नंतर मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे. पण या दौऱ्याचं महत्व नेहमीपेक्षा अधिक आहे. कारण यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलं आहे. आपल्या अत्यंत जवळच्या मित्रराष्ट्रांना, खास पाहुण्यांनाच अमेरिकेत स्टेट व्हिजिटसाठी बोलावलं जातं. त्यामुळे हा एक विशेष बहुमान मानला जातो. शिवाय अमेरिकेन संसदेला दोन वेळा संबोधित करणाऱ्या विस्टर्न चर्चिल, नेल्सन मंडेला या मोजक्या नेत्यांच्या यादीत मोदींचाही समावेश होईल.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली : देवेंद्र फडणवीस)
अमेरिकेच्या संसदेत भाषण करणार मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी २० ते २४ जून या कालावधीत अमेरिकेत असणार आहेत. या दौऱ्यात अमेरिकेच्या संसदेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषणाची संधी मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. २२ जून रोजी अमेरिकेत मोदींसाठी सरकारी स्नेह भोजनही आयोजित करण्यात आलं आहे.
Prime Minister @narendramodi emplanes for the USA visit. He will be attending programmes in New York City and Washington DC. pic.twitter.com/gleEHiw0AC
— PMO India (@PMOIndia) June 20, 2023
असा असेल मोदींचा अमेरिका दौरा
२२ जून रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसमध्ये मोदींचं स्वागत केलं जाईल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह उच्चस्तरीय बैठक आणि त्यानंतर स्नेह भोजन होईल
२३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेतून भाषण करतील
आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय नेत्यांसह तिथले सीईओ, उद्योगपती आणि भारतीय रहिवासी यांचीही भेट घेणार आहेत.
जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं मोदींचा हा अमेरिका दौरा महत्वाचा मानला जात आहे. मोदी आणि बायडेन या दोन्ही नेत्यांची केमिस्ट्री कुठला नवा अध्याय लिहिते का हेही पाहणं महत्वाचं असेल. संरक्षणापासून ते अगदी वातावरणातील बदल अशा वेगवेगळ्या विषयांवर नेमकी काय धोरणं आकार घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community