पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ‘मराठी’त ट्विट, काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत येणार आहेत. यावेळी ते 38 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच काही विकास कामांचे लोकार्पणही करणार आहेत. परंतु दौ-यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून केलेल्या ट्वीटची सर्वत्र चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत मुंबईत येणार असल्याचे सांगितले.

काय म्हटलंय ट्वीटमध्ये?

मी मुंबईत असेन. 38 हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या या ट्वीटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिप्लाय केला आहे. मुंबई नगरीत आपले मन:पुर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर गुरुवारी दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा होणार आहे.

( हेही वाचा: ‘त्या’ मराठी चित्रपटांना आता मिळणार एक कोटींचे अनुदान; मुनगंटीवार यांची घोषणा )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here