Narendra Modi : उन्हाळा म्हटलं गरमीने लोकं हैराण होतात. पण याच उन्हाळ्यात फळांचा राजा असलेल्या आंब्याची (Mango) चव आता दिल्लीकर चाखणार आहेत. कोकणातील हापूसची चव ही प्रत्येक आंबाप्रेमीच्या जीभेवर रेंगाळते, अगदी परदेशातही हा आंबा जातो. कधी आणि कुठे ? अहो खुद्द दिल्लीत, कारण राजधानी दिल्लीमध्ये आंबा महोत्सवाचे (Delhi Mango festival) आयोजन करण्यात येणार असून या दिमाखदार महोत्सवाचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी खुद्द देशाच्या पंतप्रधानांच्या, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांच्या संकल्पनेतून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Vinod Kambli : विनोद कांबळीला सुनील गावस्कर यांची फाऊंडेशन देणार महिन्याला ३०,००० रुपये)
या महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत. ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सव (Mango Festival) येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Indian Share Market : डिसेंबर २०२५ पर्यंत भारतीय सेन्सेक्स ८३,००० हजारांवर असेल; जागतिक संशोधन कंपनीचा अंदाज)
या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार वायकर यांनी माध्यम समूहाला दिली. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावे यासाठी त्यांची भेट घेतली होती. प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले होते अशी माहिती त्यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community