पंतप्रधान मोदी त्यानंतर पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. यावेळी त्यांना पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी राजमुद्रा असलेला शाही फेटा पंतप्रधान मोदी यांना घातला.
शिवरायांना केले अभिवादन
On landing in Pune, PM @narendramodi unveiled a statue of Chhatrapati Shivaji Maharaj. pic.twitter.com/0zKyhORNRI
— PMO India (@PMOIndia) March 6, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
(हेही वाचा पंतप्रधान मोदींचे स्वागत, मुख्यमंत्री मात्र गैरहजर! कारण काय?)
मेट्रोचे केले उदघाटन
प्रधानमंत्री @narendramodi ने पुणे मेट्रो रेल परियोजना का उद्घाटन किया
पूरी परियोजना 11,400 करोड़ रुपये से अधिक की कुल लागत से बनाई जा रही है#PuneMetro pic.twitter.com/0Yub4tOnQs
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) March 6, 2022
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उदघाटन केले. गरवारे मेट्रो स्थानकात पंतप्रधान मोदी यांनी बटन दाबून हिरवा झेंडा दाखवून मेट्रोला प्रकल्पाचे लोकार्पण केले. त्यावेळी त्यांनी पहिले तिकीट काढले. मेट्रोमध्ये बसल्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिव्यांग प्रवाशांशी संवाद साधला. या मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष डबा आहे.
(हेही वाचा पुण्यात पंतप्रधान मोदींचे स्वागत काळ्या झेंड्याने…)
Join Our WhatsApp Community