पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. ते नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांना संबोधित करतील. यावर्षी, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने भारतभरातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. या मोहिमेत ८८,००० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. (PM Narendra Modi)
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिट्स, नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) आणि अनेक शैक्षणिक संस्थांच्या पाठिंब्याने देशभरातील ‘माय भारत’ स्वयंसेवक, भारतासाठी स्वयंसेवक म्हणून उपक्रम राबविण्यासाठी त्यांची ऊर्जा एकवटतील. १२ जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरे आणि ७५० जिल्हा मुख्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षित रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांना केंद्र/राज्य मंत्री, स्थानिक खासदार किंवा आमदार यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून, व्यापक मोहिमेद्वारे उद्याची सुरक्षितता निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शविली जाईल. हे स्वयंसेवक वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक हाताळण्यात मदत करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी तैनात केले जातील. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – BMC : मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान)
अशी असेल कार्यक्रमाची रुपरेखा
स्वयंसेवक मुलांसाठी कथाकथन सत्रासाठी अंगणवाडी केंद्रांनाही भेट देतील आणि सरकारी योजनांच्या माहितीचा प्रसार करतील. देशभरातील ७६३ जिल्ह्यांमध्ये, स्वामी विवेकानंद यांना पुष्पांजली अर्पण करून, जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा दिन २०२४ च्या भव्य कार्यक्रमाची सुरुवात होईल. यावेळी जिल्ह्याचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आणि तरुणांचे कलागुण प्रदर्शित करणारा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. (PM Narendra Modi)
कार्यक्रमाची भागीदार मंत्रालये आणि त्यांची जिल्हास्तरीय कार्यालये १२ जानेवारी २०२४ रोजी विविध प्रदर्शने/उपक्रम/नोंदणी/जागरूकता मोहिमेसाठी स्टॉल्स उभारतील. तसेच वाहतूक जागरूकता, पोषण आणि आहार, केव्हीआयसी स्टार्टअप्सची उत्पादने, पीएमईजीपी लाभार्थी इ. मुद्द्यांवर यावेळी भर दिला जाईल. वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन डिजीटल माय भारत व्यासपीठावर जिल्हा स्तरावर तयार केले जात आहे, जेणेकरुन जास्तीतजास्त युवकांपर्यंत पोहोचता येईल. प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आणि युवा आकांक्षा व्यापक स्तरावरील उपक्रमांमधून प्रतिबिंबित व्हावेत, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने दिली आहे. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community