पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोव्हेंबरमध्ये सोलापूर दौरा करणार असून या दौऱ्यात ते सोलापुरातील पंधरा हजार असंघटित कामगारांना घरकुलांच्या चाव्या देणार आहेत. तसे पत्र केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव कुलदीप नारायण यांनी रे नगर संस्थेला पाठविल्याची माहिती प्रकल्पाचे प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.
(हेही वाचा – अनेक जनावरे मिळूनही वाघाची शिकार अशक्य; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला)
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत रे नगरच्या माध्यमातून कुंभारी येथे ३० हजार घरकुल प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पंधरा हजार घरकुलांचे वाटप नोव्हेंबरमध्ये होणार आहे. सध्या १३ हजार घरांचे काम पूर्ण झाल्याची माहिती आडम यांनी दिली. ऑक्टोबरपर्यंत पंधरा हजार घरे तयार होतील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये घरकुल वाटप कार्यक्रम नियोजित आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चाव्या वाटप कार्यक्रमाला मीच येणार असल्याची ग्वाही त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली होती. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community