यंदाच्या दिवाळीत सकारात्मक वातावरण आहे. मागील वर्षीच्या दिवाळीत जी भीती होती, ती यंदाच्या वर्षी राहिली नाही. स्वदेशी लसीने सुरक्षेचा विश्वास निर्माण केला आहे. आता सणासुदीचे दिवस आहे. दिवाळीमध्ये वर्षभराच्या तुलनेत सर्वाधिक खरेदी-विक्री होत असते. अशा वेळी भारतीयांनी जसा स्वदेशी लसीवर विश्वास ठेवला, तसा विश्वास स्वदेशी उत्पादनांवर ठेवावा. ‘व्होकल फॉर लोकल’ व्यवहारात आणावा लागेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गुरुवार, २१ ऑक्टोबर रोजी भारताने १०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा गाठून ऐतिहासिक विक्रम केला. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधून देशाचे अभिनंदन केले, तसेच सणासुदीचा काळ आहे, कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत आवाहन केले.
(हेही वाचा : पुण्यातील रिंग रोड प्रकल्प ३४ वर्षांपासून रखडला! नजर लागेल असा होता आराखडा)
भारतनिर्मित लसीवर विश्वास तर उत्पादनांवरही ठेवा!
एक काळ होता देशात ‘मेड इन अमुक’, ‘मेद इन तमुक’, अशी चर्चा असायची, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सर्वत्र भारतनिर्मित उत्पादनाचा बोलबाला सुरु झाला आहे. मागच्या वर्षी दिवाळीत तणाव होता, पण १०० कोटी लसीकरणाच्या टप्प्यानंतर यावेळी विश्वास निर्माण झाला आहे. भारतनिर्मित लसीने भारतीयांना आरोग्याची शास्वती दिली, मग भारतनिर्मित उत्पादनांवर विश्वास का ठेवता येणार नाही?, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community