पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी 12 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे विकास प्रकल्प देशाला भेट देणार आहेत. यासोबतच ते मध्य प्रदेश (PM Narendra Modi Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमधील अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य केंद्रांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. धनतेरस आणि 9 व्या आयुर्वेद दिनानिमित्त (Ayurveda Day), पंतप्रधान मोदी दिल्लीच्या एम्समध्ये 12,850 कोटी रुपयांच्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. (Narendra Modi)
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्मान भारत (Ayushman Bharat), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) व्यतिरिक्त, इतर अनेक योजनांसह, PM मोदी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना सुरू करणार आहेत. ही योजना सुरू झाल्यानंतर देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळणार आहे. ज्यामध्ये उत्पन्नाची भूमिका नसते. म्हणजेच सर्वांना समान आरोग्य लाभ मिळतील.
(हेही वाचा – OnePlus 13 : वनप्लस १३ मालिका चीनमध्ये लवकरच होणार लाँच, भारताविषयी उत्सुकता)
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, देशभरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा पंतप्रधानांचा सातत्याने प्रयत्न आहे. मंगळवारी, मोदी आरोग्य सेवा (Health care) पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी अनेक आरोग्य सेवा संस्थांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यासोबतच पंतप्रधान मोदी भारतातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. यात पंचकर्म रुग्णालय, औषध निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी, स्पोर्ट्स मेडिसिन युनिट, केंद्रीय ग्रंथालय, एक आयटी आणि स्टार्ट-अप इनक्युबेशन सेंटर आणि 500 आसनांचे सभागृह यांचा समावेश आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community