PM Narendra Modi यांच्या सभेमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य

राज्यातील पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच जागांवर १९ एप्रिलला मतदान होणार असून राजकीय पक्षांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.

166
कांदा, सोयाबीन, धान उत्पादकांना Central Govt चा दिलासा

‘अबकी बार ४०० पार’ चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रचार सभांचे रणशिंग फुंकणार असून पहिली जाहीर सभा विदर्भातील चंद्रपूर येथे येत्या सोमवारी ८ एप्रिलला आयोजित करण्यात आल्याचे भाजपा प्रदेश कार्यालयातून सांगण्यात आले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. या सभेमुळे भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य संचारले आहे. (PM Narendra Modi)

राज्यातील पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच जागांवर १९ एप्रिलला मतदान होणार असून राजकीय पक्षांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. (PM Narendra Modi)

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) सलग तीन वेळा म्हणजेच २००९, २०१४ आणि २०१९ राज्याच्या विधानसभेत बल्लारपूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी काही वर्षांत विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे, यात अर्थ आणि वन खात्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे स्थानिक लोकही मान्य करत असून त्यांच्यासाठी मतदार संघात पोषक वातावरण आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने वागू नका)

मोदींच्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोमवारी होणाऱ्या सभेमुळे मुनगंटीवार यांच्या विजायावर एकप्रकरे शिक्कामोर्तबच होणार असल्याच्या भावना भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मोदी यांची चंद्रपूरमध्ये होणारी राज्यातील ही पहिलीच सभा असून यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे, ज्यामुळे पक्षनेते आणि कार्यकर्ते आणखी जोमाने कामाला लागतील, असे एका भाजपा पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. (PM Narendra Modi)

८.९१ लाखाहून अधिक महिला मतदार

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ असून त्यातील राजुरा, चंद्रपूर, वरोरा आणि बल्लारपूर हे चार चंद्रपूर जिल्ह्यात आहेत तर वणी आणि अर्णी हे दोन मतदार संघ यवतमाळ जिल्ह्यात आहेत. या लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ३६ हजार ३१४ मतदार असून ९.४५ लाखाहून अधिक पुरुष आणि ८.९१ लाखाहून जास्त महिला मतदार आहेत. तसेच नवोदित (१८ ते १९ वयोगटातील) मतदार २५ हजाराहून अधिक आहेत. मुनगंटीवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर निवडणूक रिंगणात आहेत. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.