पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

114

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना २७ डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. गेल्या १८ जून रोजी हीराबेन मोदी यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती जी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये मोदींनी त्यांच्या आईची भेट घेतली होती.

(हेही वाचा – Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर, काय आहे हा कायदा?)

रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी

दरम्यान, अहमदाबाद येथील यू एन मेहता रूग्णालय व्यवस्थापनाने मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. यामध्ये असे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात जास्त माहिती देण्यात आलेली नाही. फक्त रूग्णालयात दाखल करण्याबद्दल माहिती दिली आहे आणि हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

1ad7edb0221e48e2358ead086245942b1672216615916381 original

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.