नारी शक्तीला सलाम, काय म्हणाले पंतपधान?

98

जगभरात आज महिला दिन खूप उत्सवात साजरा केला जात आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट करत, नारी शक्तीला सलाम करत नारीला अभिवादन केले आहे.

केंद्र संधी देत राहील

जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष संदेश देत, ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महिला दिनानिमित्त, नारी शक्तीला आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीला अभिवादन, अशा आशायाचे ते ट्वीट आहे. केंद्र सरकार विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत करत राहील आणि सन्मान आणि संधी यावर भर देईल, असेही या ट्वीटद्वारे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

( हेही वाचा मराठी न शिकवणा-या शाळांवरच्या कारवाईचे आदेश कागदावरच! )

पंतप्रधानांकडून शुभेच्छा

आर्थिक समावेशनापासून ते सामाजिक सुरक्षा, दर्जेदार आरोग्यसेवा ते गृहनिर्माण, शिक्षण ते उद्योजकतेपर्यंत, आपल्या नारी शक्तीला भारताच्या विकासाच्या प्रवासात आघाडीवर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. हे प्रयत्न आगामी काळात आणखी जोमाने सुरू राहतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.