एसटीच्या खासगीकरणावर काय म्हणाले अनिल परब? वाचा…

एसटी कर्मचा-यांचा मागचा काही दिवसांपासून संप सुरु आहे. अनेक बैठकांच्या वा-या होऊनही सरकार यावर कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. त्यातच एसटीचे खासगीकरण होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर उत्तर देताना, राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा विचार नाही, मात्र तो एक पर्याय आहे, असे वक्तव्य अनिल परब यांनी केले आहे.

काय म्हणाले परब?

या विलिनीकरणाच्या निर्णयावर समिती निर्णय घेईल, असे मंत्री परब यांनी म्हटले आहे. चर्चा नेमकी कुणाशी करायची?  एसटी कर्मचारी ना युनियनचे ऐकत ना भाजप नेत्यांचे. हे आंदोलन नेतृत्वहीन झाले आहे. कामगारांनी सांगावे कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करत आहे. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जातो. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनदा बोललो. पण नंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. त्यापेक्षा त्यांनी चर्चा करावी, असेही परब म्हणाले.

…त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल!

फडणवीस यांनी प्रवाशी कराचा फॉर्म्यूला सांगितला, जो आम्ही गांभीर्याने घेतला आहे. कोरोनापूर्व काळात हा फॉर्म्यूला शक्य होता. आता खूप मोठा गॅप पडला आहे. आताही तो करता येईल. त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल, असंही अनिल परब पुढे  म्हणाले.

 (हेही वाचा : …तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here