भाजपा खासदाराने 1984 शीख दंगलीची बॅग Priyanka Gandhi यांना दिली, कारण काय?

68
भाजपा खासदाराने 1984 शीख दंगलीची बॅग Priyanka Gandhi यांना दिली, कारण काय?
  • प्रतिनिधी 

या वेळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बॅगवर बरेच राजकारण पाहायला मिळाले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) पॅलेस्टाईनचा मुद्दा मांडण्यासाठी एका बॅगेवर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा लिहून संसदेत पोहोचल्या होत्या. यामुळे आता भाजपानेही प्रियांका गांधी आणि काँग्रेस पक्षाला चांगलेच घेरले आहे.

(हेही वाचा – Mohammad Shami : मोहम्मद शमी विजय हजारेच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही)

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी बांगलादेशी हिंदूंचा मुद्दा उपस्थित केला होता. पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रियांका गांधी यांच्या पिशवीवर हिंदू स्लोगन लिहिलेले होते आणि बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांसोबत असल्याचा संदेश दिला होता. याकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोपही काँग्रेस नेत्याने केला होता.

(हेही वाचा – Water : मुंबईतील वाढती पाणी समस्या दूर करण्यासाठी गारगाई व पिंजळ प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी)

शीख दंगलीचा नारा असलेली बॅग भाजपाने दिली

भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांनी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना 1984 लिहिलेली बॅग दिली आहे. पिशवीवर 1984 क्रमांक रक्ताने रंगलेले दाखवले आहेत. वास्तविक भाजपाने या पिशवीतून शीख दंगलीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. भाजपा खासदार म्हणाले की, देशातील जनतेने काँग्रेसला नेहमीच नाकारले आहे. याचा काँग्रेसवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.

(हेही वाचा – Kalyan Marathi Family Case : “आता माज उतरवण्याची वेळ आलीय”, मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक)

अधिवेशनाचे सूप वाजले

हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आजही संसदेत प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. त्याचवेळी राज्यसभेतील गदारोळामुळे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.