काँग्रेस खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) सोमवार, १६ डिसेंबर रोजी संसदेत पॅलेस्टाईनच्या (Palestine) समर्थनार्थ बॅग घेऊन पोहोचल्या. या बॅगवर कापलेल्या कलिंगडाचेही चित्र होते. ज्याला पॅलेस्टीनी संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईनच्या युद्धात (israel palestine conflict) काँग्रेसने हमासच्या आतंकवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पॅलेस्टाईनचे समर्थन केले होते. खासदार प्रियंका गांधी यांनी सातत्याने पॅलेस्टाईन आणि हमासचा बालेकिल्ला असलेल्या गाझाचे समर्थन करत आहेत. प्रियंका यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हाही इस्रायलला लक्ष्य केले होते. तसेच इस्रायलच्या पंतप्रधानांवरही टीका केली होती.
(हेही वाचा – रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा; भाजपाचे आमदार Niranjan Davkhare यांची मागणी)
भारत नाव कधी लिहिले जाईल ? – भाजपाचा प्रश्न
त्यांच्या पॅलेस्टाईन समर्थनावर भाजपाने जोरदार टीका केली. भाजपा खासदार संबित पात्रा (Sambit Patra) म्हणाले की, गांधी कुटुंबाने नेहमीच तुष्टीकरणाची बॅग उचलण्याचे काम केले आहे.
प्रियंका गांधींच्या बॅगेवर पॅलेस्टाईन लिहिले आहे, तुम्ही समजू शकता की त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. काही दिवसांपूर्वीच त्यावर इटली लिहिले होते आणि आता पॅलेस्टाईन लिहिले आहे. भारत नाव कधी लिहिले जाईल माहीत नाही. ज्याच्या मनात भारताबद्दल प्रेम नाही, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारताबद्दल वाईट बोलतात, भारताच्या लोकशाहीबद्दल वाईट बोलतात, ते भारताचे समर्थक नाहीत. ते पॅलेस्टाईनच्या बाजूचे आहेत.
– भाजपा खासदार मनोज तिवारी
उलट पाकिस्तानमधून प्रियंका वाड्रा (Priyanka Gandhi) यांना समर्थन मिळाले आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी ‘नेहरूंची पणती’ असे म्हणत प्रियंका गांधींचे कौतुक केले होते. तसेच असे कोणतेही पाऊन न उसलणाऱ्या पाकिस्तानी खासदारांवर त्यांनी टीका केली होती.
पॅलेस्टिनच्या समर्थनावरून टीका झाल्यानंतर १७ डिसेंबर रोजी बांगलादेशातील हिंदू (Hindus In Bangladesh) आणि ख्रिस्ती यांच्या समर्थनाची बॅग घेऊन आल्या. मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी संसद परिसरात काँग्रेस खासदारांनी बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचावर केंद्र सरकार काहीही बोलत नाही म्हणून आंदोलन केले. या वेळी प्रियंका गांधी यांच्या हातात “बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्यामागे उभे राहा” असे लिहिलेली बॅग होती. दरम्यान काँग्रेस खासदारांच्या आंदोलनावेळी सर्वांच्या हातात ही खास बॅग दिसली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community