लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळीत पंजाबमधून (Punjab) धक्कादायक बातमी पुढे आलीय. राज्यातील खडूर साहिब मतदारसंघातून खलिस्तान समर्थक अमृतपाल विजयी झालाय. अमृतपाल सध्या कारागृहात असून त्यांनी 1 लाख 97 हजार 120 मतांनी विजय संपादित केलाय. दरम्यान राज्यातील लोकसभेच्या 13 जागांपैकी काँग्रेसने 7, आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) 3 आणि शिरोमणी अकाली दलाने एक जागा जिंकली आहे.
(हेही वाचा – Amol Kolhe यांनी पोस्ट केला व्हिडिओ; Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांची खिल्ली)
1 लाख 97 हजार 120 मतांनी विजयी
निवडणूक आयोगाच्या निवडणूक निकालानुसार कट्टरतावादी अमृतपाल सिंग यांना खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून 1 लाख 97 हजार 120 मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यांनी काँग्रेसच्या (Congress) कुलबीर सिंग झिरा यांचा पराभव केला. या जागेवर आम आदमी पक्षाचे उमेदवार आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री लालजीत सिंग भुल्लर 1 लाख 94 हजार 836 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
फरीदाकोट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि अतिरेकी सरबजीत सिंग खालसा यांनी आदमी पक्षाचे उमेदवार आणि कॉमेडियन करमजीत अनमोल यांचा 70 हजार 53 मतांनी पराभव केला आहे. भटिंडा लोकसभा मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंजाबचे कृषी मंत्री गुरमीत सिंग खुदियान यांचा 49 हजार 656 मतांनी पराभव केला आहे. दरम्यान भाजपला राज्यात एकही जागा जिंकता आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community