शिरोमणी अकाली दलाचे नेते, खलिस्तानी समर्थक, पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंग मान (Simranjit Singh Mann) यांनी खासदार कंगना रणौत यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलनावेळी झालेल्या बलात्कारांवरून कंगना रणौत यांनी केलेल्या विधानाला ते प्रत्युत्तर देत होते.
काय म्हणाले सिमरनजीत सिंग मान?
याप्रकरणी काय बोलावं हे मला कळत नाही. पण कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता की बलात्कार कसा होतो, जेणेकरून लोकांना समजेल की बलात्कार कसा होतो, असे संगरूरचे माजी खासदार सिमरनजीत सिंग (Simranjit Singh Mann) म्हणाले. आता रद्द करण्यात आलेल्या कृषी सुधारणा कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा खासदार कंगना रणौत यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता सिमरनजीत मान यांनी ही टिप्पणी केली. पंजाब महिला आयोगाने या वक्तव्याची दखल घेतली असून याविरोधात कारवाई केली जाईल, असे म्हटले.
(हेही वाचा राज्यसभेत भाजपाप्रणीत NDA पोहोचली बहुमताच्या जवळ)
कंगना रणौत यांचे प्रत्युत्तर
हा देश बलात्काराला क्षुल्लक समजणे कधीच थांबवणार नाही असे दिसते. आज या ज्येष्ठ नेत्याने बलात्काराची तुलना सायकल चालवण्याशी केली. बलात्कार आणि मौजमजेसाठी महिलांवरील हिंसाचार या पुरुषप्रधान राष्ट्राच्या मानसिकतेत इतका खोलवर रुजलेला आहे की त्याचा सहज वापर केला जातो याचे आश्चर्य वाटत नाही.चित्रपट निर्माता असो वा राजकारणी असतो महिलांची टींगल केली जाते, अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांनी दिली.
Join Our WhatsApp Community